प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
धारदार तलवारीसह १९ वर्षीय युवकास चाकण उत्तर पोलिसांनी घेतले ताब्यात..
अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध चाकण उत्तर पोलिसांची धडक कारवाई…
पोलीस स्टेशन चाकण उत्तर हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याच्या अनुषंगाने तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, तपास पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कारवाई केली असता आकाश नवनाथ लोखंडे, वय १९ वर्षे, रा. चिंचोशी हा इसम धारदार तलवारीसह मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील धारदार तलवार जप्त करण्यात आली.
सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम कलम 4/25 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील कायदेशीर कार्यवाही केली आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त मारुती जगताप, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश रांजणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम व पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत आरदवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण उत्तर पोलीस स्टेशनचे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक मोरखांडे, पोलीस अमलदार शिंदे, कोळेकर, ढमढेरे, लोखंडे, कोळी, जगताप, सांडभोर
तपास पथक, पोलीस स्टेशन चाकण उत्तर.पोलीस स्टेशन चाकण उत्तर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय
Share this content:
