
प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी संघटना यांची त्रैमासिक सभा दिनांक 28 जून 2026 रोजी आळंदी येथील कारवा धर्मशाळा संपन्न झाली.या त्रैमासिक सभेचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी श्री राम राठोड यांनी केले. तर सभेचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी श्री एस. एस. साळुंखे यांनी केले. सदर या त्रैमासिक सभेत सरचिटणीस श्री बालाजी पोतदार साहेब यांनी संघटनेच्या कामकाजा विषयी सविस्तर माहिती सांगितली. तर कोषाध्यक्ष श्री. रामप्रसाद मुंडे यांनी संघटने कडील सर्व आर्थिक जमा खर्चाचा लेखाजोखा सादर केला. त्यानंतर पुणे जिल्हा संघटनेचे पदाधिकारी यांचे मार्गदर्शन झाले. तसेच विविध जिल्ह्यातून आलेले अध्यक्ष सचिव यांनी विस्तार अधिकारी संघटना यांच्या मागण्यांबाबत आपले मत व्यक्त केले. सरते शेवटी महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी संघटनेचे अध्यक्ष तथा सभेचे अध्यक्ष श्री. अनिल गांवडे साहेब यांनी विस्तारधिकारी संघटनेचे विविध प्रश्न सोडवणे बाबत जे प्रयत्न केले. त्याबद्दलची सर्व माहिती या वेळी उपस्थितांना दिली. तसेच पुढील संघटनेच्या विविध मागण्यां विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी या त्रैमासिक सभेला मोठ्या प्रमाणात सभासद प्रतिनिधी उपस्थित होते.
Share this content:
