
प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
खेड तालुका ठेकेदार संघटनेच्या संचालक मंडळाची निवड खेड येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. मावळते अध्यक्ष अविनाश काळे,उपाध्यक्ष समीर आरुडे,सचिव शैलेश सांडभोर यांचा कार्यकाळ संपल्याने नविन कार्यकारिणी निवड करण्यात आली यात अध्यक्ष मनोज थिगळे ,उपाध्यक्ष महेश होले सचिव पंकज शेठ पाटोळे, खजिनदार पप्पू शेठ बनसोडे, आणि तज्ञ संचालक यज्ञेश बोंबले या सर्वांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी खेड तालुक्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक मंडळ ठेकेदार संघटनेचे सर्व आजी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व खेड तालुक्याचे ठेकेदार बंधू उपस्थितीत होते.अध्यक्ष मनोज थिगळे उपाध्यक्ष महेश होले सचिव पंकज शेठ पाटोळे खजिनदार पप्पू शेठ बनसोडे आणि तज्ञ संचालक यज्ञेश बोंबले या सर्वांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य ठेकेदार संघटनेच्या वतीने व खेड तालुका ठेकेदार संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.तसेच या सर्वांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे व सर्वांचे अभिनंदन करुन भावी वाटचालीच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
Share this content:
