प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (गळीत धान्य कार्यक्रम) अंतर्गत मौजे औदर येथील ‘राम कृष्ण हरी शेतकरी बचत गट’ आणि कुडे खुर्द येथील ‘भैरवनाथ कृषि विकास गट’ यांच्या सभासदांना कृषि विभागामार्फत भुईमुगाचे बियाणे व जैविक निविष्टांचे वाटप करण्यात आले. सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती प्राजक्ता वाघ मॅडम यांच्या हस्ते हे वाटप संपन्न झाले.
याप्रसंगी प्राजक्ता वाघ मॅडम यांच्या थेट मार्गदर्शनाखाली शेतकरी गटांमार्फत दशपर्णी अर्क तयार करण्यात आला. हा अर्क तयार करण्याची पद्धत आणि त्याचे शेतीसाठी होणारे फायदे-तोटे त्यांनी शेतकऱ्यांना सविस्तर समजावून सांगितले.
यासोबतच शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी खालील महत्त्वाच्या विषयांवर शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले:
बीजप्रक्रिया व उगवण क्षमता: पेरणीपूर्वी बियाणांची तपासणी आणि प्रक्रिया कशी करावी.रुंद सरी वरंबा पद्धत (BBF): पाण्याचे योग्य नियोजन व अधिक उत्पादनासाठी पेरणीची आधुनिक पद्धत. खत व नैसर्गिक शेती व्यवस्थापन: रासायनिक खतांचा संतुलित वापर आणि नैसर्गिक शेतीचे महत्त्व. कृषि योजना: कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती.या कार्यक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साह असून, आधुनिक व नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करण्यास मदत होणार असल्याचे गटातील सभासदांनी सांगितले.सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती प्राजक्ता वाघ मॅडम यांच्या हस्ते हे वाटप संपन्न झाले.
याप्रसंगी प्राजक्ता वाघ मॅडम यांच्या थेट मार्गदर्शनाखाली शेतकरी गटांमार्फत दशपर्णी अर्क तयार करण्यात आला. हा अर्क तयार करण्याची पद्धत आणि त्याचे शेतीसाठी होणारे फायदे-तोटे त्यांनी शेतकऱ्यांना सविस्तर समजावून सांगितले.
यासोबतच शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी खालील महत्त्वाच्या विषयांवर शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले:
बीजप्रक्रिया व उगवण क्षमता: पेरणीपूर्वी बियाणांची तपासणी आणि प्रक्रिया कशी करावी.रुंद सरी वरंबा पद्धत (BBF): पाण्याचे योग्य नियोजन व अधिक उत्पादनासाठी पेरणीची आधुनिक पद्धत.खत व नैसर्गिक शेती व्यवस्थापन: रासायनिक खतांचा संतुलित वापर आणि नैसर्गिक शेतीचे महत्त्व.
कृषि योजना: कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती.या कार्यक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साह असून, आधुनिक व नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करण्यास मदत होणार असल्याचे गटातील सभासदांनी सांगितले.
Share this content: