
प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
पिंपरी चिंचवड, २२ ऑगस्ट २०२६ : स्वराज्य फिल्म प्रोडक्शन आणि सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कलाक्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल देण्यात येणारा दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा आज आचार्य अत्रे नाट्यगृह, पिंपरी चिंचवड येथे उत्साहात पार पडला.
या सोहळ्यात राजगुरुनगर येथील ज्येष्ठ अभिनेत्री अलका जोगदंड आणि लोणी धामणी येथील कलाकार श्रीराम विधाटे यांना त्यांच्या कला, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य फिल्म प्रोडक्शन व सोशल फाउंडेशनचे गिरीश शिवदास राजूरकर यांनी केले होते. अलका जोगदंड या गेल्या सुमारे ३० वर्षांपासून सामाजिक आणि कला क्षेत्रात अनेक पुरस्कार प्राप्त झाले त्याच्या या कार्याची दखल घेउन त्यांना डॉ लोक शाहीर अण्णा भाऊ साठे राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला असून विविध क्षेत्रांतील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात आला.
श्रीराम विधाटे यांनीही नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. त्यांनी मुंबईतील नाट्यनिर्माते मोहनराव पानसरे यांच्या मुळासकट या नाट्यप्रयोगात भूमिका साकारली आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल पानसरे यांनी दूरध्वनीवरून विधाटे यांचे अभिनंदन केले. हा पुरस्कार केवळ आपला नसून महाराष्ट्रातील सर्व लहान-मोठ्या कलाकारांचा सन्मान असल्याची भावना विधाटे यांनी व्यक्त केली.
या दोन्ही कलाकारांनी शिरूर येथील तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून लघुचित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे निर्माते रामदासजी राऊत यांनी या कलाकारांना संधी दिली असून, त्यांनी त्या संधीचे सोने केले, असे सांगत दोन्ही कलाकारांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध निर्माते बाळासाहेब बांगर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, दिग्दर्शक रमेश चौधरी यांच्यासह कला व चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार वितरणानंतर आयोजक गिरीश राजूरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर चहा-पानाच्या कार्यक्रमाने सोहळ्याची सांगता झाली.
Share this content:
