प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
चाकण : स्वातंत्र्य सेनानी व दुर्गाई हृदय प्रतिष्ठानचे संस्थापक स्वर्गीय द. भि. तथा मामासाहेब शिंदे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवार, दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी मैत्री सांस्कृतिक हॉल, श्री शिवाजी विद्यामंदिर व सि. भि. पाटोळे कनिष्ठ महाविद्यालय, चाकण येथे विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी आरोग्यविषयक व्याख्यान व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. डॉ. प्रतीक्षा येडले मॅडम (समुदाय आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र खेड) व आरोग्यसेविका अर्चना मांजरे मॅडम (प्राथमिक आरोग्य केंद्र खेड) यांनी किशोरवयीन विद्यार्थिनींना आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता, पोषण, मासिक पाळीतील स्वच्छता व किशोरवयीन अवस्थेतील आरोग्यविषयक आवश्यक काळजी याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
कार्यक्रमास नगराध्यक्ष श्रीमती मनीषाताई सुरेशभाऊ गोरे, श्री. अनिल दत्तात्रय खुबे सर (प्राचार्य, श्री शिवाजी विद्यामंदिर, चाकण), डॉ. इंदिरा पारखे (मा. खेड तालुका आरोग्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र खेड), डॉ. प्रतीक्षा येडले मॅडम व अर्चनाताई मांजरे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सत्कारार्थी म्हणून सौ. जयश्रीताई विशालभाऊ नायकवाडी (उपनगराध्यक्ष, चाकण नगरपरिषद), श्री. गुलाबशेठ लक्ष्मण शेवकरी (नगरसेवक, चाकण नगरपरिषद), श्री. समीरभाई मुश्ताक सिकीलकर (नगरसेवक, चाकण नगरपरिषद), श्री. करणशेठ जीवनदादा सोनवणे (नगरसेवक, चाकण नगरपरिषद), श्री. निलेशशेठ बबनराव टिकेकर (चेअरमन, चाकण नागरी सहकारी पतसंस्था), सौ. साधनाताई दीपकशेठ गोरे (नगरसेविका/चेअरमन, चाकण नागरी सहकारी पतसंस्था), श्री. दत्तात्रय वसंत गोरे (चेअरमन, चाकण विविध कार्यकारी सहकारी सोसायटी), श्री. धीरजशेठ राम आगरकर (संचालक, चाकण विविध कार्यकारी सहकारी सोसायटी), श्री. नितीन सुभाष वाडळ (चाकण शहर प्रमुख, शिवसेना – ठाकरे), श्री. नंदराम धोंडिबा भुजबळ (सल्लागार, चाकण विविध कार्यकारी सहकारी सोसायटी) तसेच श्री. बाबासाहेब रामचंद्र पवार (सल्लागार, चाकण विविध कार्यकारी सहकारी सोसायटी) उपस्थित होते.
स्मृतिदिनानिमित्त गरजू मुलांना गणवेश वाटप तसेच कै. शांताराम महादू भुजबळ वाचनालयास पुस्तके प्रदान करण्याचा सामाजिक उपक्रमही यावेळी राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन दुर्गाई हृदय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय रामचंद्र भेगडे तसेच प्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त, सभासद, दुर्गाई मेंबर व मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले. स्वर्गीय मामासाहेब शिंदे यांच्या सामाजिक कार्याची व समाजसेवेची प्रेरणा पुढे नेण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन श्री.राजू शिंदे यांनी केले होते
Share this content:
